Ambernath Death Probe: रुग्णवाहिका VIP ड्युटीवर, महिलेचा उपचाराअभावी मृत्यू?
Continues below advertisement
अंबरनाथमध्ये मीनाबाई सूर्यवंशी या ५८ वर्षीय महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 'रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात आल्यामुळे ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही', असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. हा प्रकार रविवारी संध्याकाळी घडला, जेव्हा मीनाबाई यांना उपचारासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारांसाठी त्यांना हलवण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील रुग्णवाहिका शिंदे यांच्या हस्ते होणाऱ्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पाठवण्यात आल्याचा आरोप होत आहे. रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, महिलेची प्रकृती चिंताजनक होती आणि १५ मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला, असे स्पष्टीकरण दिले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि आरएमओ करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement