Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रिया

Continues below advertisement

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रिया

हेही वाचा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपकडून राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्यात येणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मोहीमेतंर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडले जाऊ शकतात, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे एकूण 8 खासदार निवडून आले होते. यापैकी पाच ते सहा खासदारांना गळाला लावून मविआला झटका देण्याचा भाजपचा प्लॅन असल्याचे सांगितले जाते. शरद पवार गटातील या खासदारांना राजीनामा द्यायला लावून महाराष्ट्रातील पाच ते सहा मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते.  या आमदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आणून भाजपप्रणित एनडीए आघाडीची ताकद वाढण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यात भाजपचे ऑपरेशन लोटस नेमके कधी सुरु झाले, याविषयी चर्चेचा सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सागर बंगल्यावर झालेली देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामा यांची भेट हा ऑपरेशन लोटसचा आरंभबिंदू होता का, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram