Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
व्हिडीओ ट्विट करत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत?असा प्रश्न
व्हिडीओतील आमदार कोण असाही दानवेंचा सवाल
संभाजीनगर- मंत्री संजय सिरसाट यांच्या घरातील पैशाच्या व्हिडीओ नंतर अंबादास दानवे यांनी आणखी एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचे पैशांचे व्हिडिओ समोर आणले आहेत..
सत्ताधारी पक्षातील एका नेत्याच्या पैशांच्या व्हिडिओ असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केलाय..
या व्हिडीओची मुख्यमंत्र्यांकडे रितसर तक्रार करणार आहे.. मुख्यमंत्र्यांनी हा नेता कोण हे शोधावं.. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी माझाशी बोलताना दिली आहे..
दानवेंच ट्वीट
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?