Chandrapur Tiger : वाघाच्या सुटकेचा थरार कॅमेरावर कैद, तब्बल 12 तासांनंतर विहिरीत पडलेला वाघ बाहेर
Continues below advertisement
विहिरीत पडलेल्या पट्टेदार वाघाला रेस्क्यू करण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे. वनविभागाने दोरीच्या मदतीने विहिरीत खाट टाकली आणि त्या खाटेचा आधार घेत वाघाने विहिरी बाहेर उडी मारत जंगलात धूम ठोकली. वरोरा तालुक्यातील मोखाळा-अल्फार मार्गावरील गमन शिरपाते यांच्या शेतातील विहिरीत हा वाघ पडला होता. शिकारीचा पाठलाग करतांना वाघ विहिरीत पडल्याची शक्यता आहे.
Continues below advertisement