amaravati covid 19 update : अमरावतीतला अनोखा उपक्रम, कोविड19 रुग्णालयात ग्रामगीता वाचन
अमरावतीच्या कोविड रुग्णालयात एक कोरोनाग्रस्त रुग्णांनी जिल्हा प्रशासनाकडे "ग्रामगीता" वाचण्याची इच्छा व्यक्त केली आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम यांनी त्याला लगेच परवानगी दिली.. आणि आज अमरावतीच्या कोविड रुग्णालयात त्या कोरोनाग्रस्त रुग्णांनी ग्रामगीता वाचनाला सुरुवात केली विशेष म्हणजे यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम आणि कोविड रुग्णलाय व्यवस्थापक डॉ श्रीकांत फुटाणे यांच्यासह रुग्णालयातील सर्व स्टॉप आणि इतर कोरोनाग्रस्त रुग्ण सगळेच मंत्रमुग्ध झाले होते...