अमरावतीमध्ये महाराजांचा पुतळा बसवण्याची स्पर्धा, दर्यापूरमध्ये शिवसेनेने बसवला महाराजांचा पुतळा
abp majha web team
Updated at:
16 Jan 2022 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीमध्ये विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे. रवी राणांनी राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवाना बसवलेला पुतळा महापालिकेनं हटवलाय. मात्र काल रातोरात दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय.. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय.