Alphonso Mango Season Delay | कोकणात आंबा बागायतदारांची चिंता वाढली, हंगाम लांबण्याची शक्यता

कोकणात लांबलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सुरू असल्याने आंबा हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जमिनीत ओलावा असला तरी, कडक ऊन आणि उष्णतेमुळे जमिनीतील गारवा नाहीसा झाल्यास मोहोर प्रक्रिया वेळेत होणार नाही. परिणामी, हापूस आंबा हंगाम किमान तीस ते चाळीस दिवस लांबण्याची शक्यता हापूस आंबा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. 'मे महिन्याच्या मध्यापासून पाऊस झाल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील हापूस आंबा हंगाम वाया गेला होता. त्यामध्ये आता पाऊस लांबल्यानं त्याचा फटका हापूसच्या मोहोर प्रक्रियेवर होऊ शकतो,' असे उत्पादकांचे म्हणणे आहे. यामुळे आंबा उत्पादकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola