Nanded Land records: भूमिअभिलेख कार्यालयांना रोव्हर्सचं वाटप ABP Majha
Continues below advertisement
भूमि अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक रोव्हर्सचं वाटप करण्यात आलंय. त्यामुळे जिल्ह्यातील जमिन मोजणीचं काम आता जीपीएसच्या माध्यमातून अधिक अचुकपणे होणार आहे. नांदेड जिल्ह्याला १२ रोव्हर्स उपलब्ध झाल्यामुळे प्रत्येक जागेचं अक्षांश रेखांशावर मोजमाप करुन नोंदणी करता येणार आहे. हे रोव्हर्स थेट सॅटेलाईटसोबत कनेक्ट असल्यामुळे जमिनीचे अनेक वाद यामुळे निकालात नि्घतील अशी माहिती भूमिअभिलेख जिल्हा अधिक्षक एस.पी. सेठिया यांनी दिलीये. तसच जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ सुद्धा कमी होणार आहे. नांदेड जिल्ह्यातल्या उमरी आणि देगलूर इथे कोर्स स्टेशन उभारण्यात आलेयत.
Continues below advertisement