Eknath Shinde Nashik : नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे ज्योतिषाच्या दरबारी, अंनिसचा आरोप

Continues below advertisement

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्रीचा ताफा दर्शनानंतर हेलिपॅडकडे न जाता अचानक सिन्नर तालुक्याच्या दिशेने वळला, वावी गावाजवळील श्री मिरगावच्या इशानेश्वर मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत दुग्धभिषेक करत पूजा केली, यावेळी मुख्यमंत्री बरोबर दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ही उपस्थित होते मात्र मुख्यमंत्री हे केवळ दर्शनासाठी आले नव्हते तर आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी आले होते अशी चर्चा आहे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कॅप्टन अशोक खरात अंकशास्त्रचे अभ्यासक आहेत, अनेक राजकिय नेते सेलिब्रिटीसह व्यापरी उद्योजक त्यांच्याकडे मार्गदर्शनसाठी जात असतात, त्याच पद्धतीने मुख्यमंत्री ही त्यांच्याकडे जाऊन स्वतःचे म्हणजेच सरकारचे भवितव्य जाणून घेतल्याची चर्चा आहे, मात्र या विषयी मुख्यमंत्री आणि खरात दोघांनीही प्रतिक्रिया दिली नाही, देवस्थानच्या विश्वस्तनी मुख्यमंत्री देवदर्शनसाठी आले होते शेतकरी जनतेसमोरील  अडचणी संकट दूर व्हावेत यासाठी प्रार्थना केल्याची माहिती दिलीय. मात्र या प्रकरणी अंनिस ने मात्र आवाज उठविला आहे.. मुख्यमंत्री जर  भविष्य बघण्यासाठी गेले असतील तर ही बेजबाबदार कृती असून त्यांचा निषेध केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram