ABP News

Sangli Allegation of Anis : 14 वर्षाच्या मुलाचा मांत्रिकाच्या मारहाणीत मृत्यू? - अंनिस

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमध्ये १४ वर्षांच्या शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय. आर्यन दीपक लांडगे असं या मुलाचं नाव असून मांत्रिकाच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केलाय. इरळी गावातील दीपकला सतत ताप येत होता. म्हणून त्याला कर्नाटकमधील शिरगूर गावातील मांत्रिकाकडे नेले. त्या मांत्रिकाने बाहेरची बाधा असल्याचं सांगत आर्यनला अमानुष मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला मिरजमधील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तो वाचू शकला नाही. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram