Yavatmal : लोहारा पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाथी ABP Majha
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा
Updated at:
06 Jan 2022 11:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिला सक्षमीकरणाबाबत अनेकदा बोललं जातं, मात्र यवतमाळच्या पोलीस दलाने प्रत्यक्ष कृती करून एका पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज महिलांच्या हाती देऊन नव्या पर्वाची सुरवात केली आहे. यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशनमध्ये नव्या बदलाची सुरुवात झाली आहे. येथे पोलीस शिपाई ते वाहन चालक, बिट अंमलदार, पोलीस निरीक्षक अशी सर्वच महत्त्वाचे जबाबदारी आता लोहारा पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी कर्मचारी सक्षमपणे सांभाळत असून यामुळे यवतमाळ पोलीस दलात नव्या इतिहासाला सुरुवात झाली आहे.