All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?

Continues below advertisement

All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. सोबतच ज्यांनी या प्रकरणात मदत केली त्यांचा सहआरोपी म्हणून उल्लेख केला पाहिजे. प्रकरणाशी संबंध असलेल्या सर्वांवर कारवाई करायला हवी. जे जे यात सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसह संतोष देशमुखांच्या आरोपींना फाशी देण्यात यावी, या मागणीला घेऊन छत्रपती संभाजीराजेंच्या (Chhatrapati Sambhaji Raje) नेतृत्वात आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेत आहोत. आमची मुख्य मागणी हीच आहे की, मारेकरी जे आहेत त्यांना फाशी द्यायला पाहिजे. सध्या यात एकच आरोपी दिसत आहे, पण जो सहभागी आहेत त्यांवर ही कारवाई करावी. किंबहुना जिल्ह्यात टोळीयुद्ध झाले नाही पाहिजे. आम्ही हा विषय पोटतिडकीने मांडतो आहे. म्हणून वेळीच दखल घ्यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला जात असल्याची माहिती  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांनी दिली आहे.

पंकजा मुंडे या प्रकरणात थोड्या तरी बोलल्या काय? - बजरंग सोनवणे

ज्यांनी आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली आहे ते दोन ते तीन पीआय आहेत. त्यांचे सीडीआर काढा. खंडणीचे आरोपी आहेत त्यांच्या वरही तात्काळ कारवाई करावी. एसआयटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यातील सदस्यांची नियुक्ती ही खंडणी आरोपत आहे. दरम्यान जिल्ह्यात आणि राज्यात हे प्रकरण गाजत असतांना पंकजा मुंडे थोड्या तरी बोलल्या काय? बोलल्या असतील तर मी काहीच बोललेले ऐकले नाही. मी लोकसभा सदस्य झालो तेव्हापासून व त्याआधी भूमिका घेतली आहे. सर्वधर्म समभाव या भावनेतून मी काम केले आहे. मी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. आम्ही हा विषय पोटतिडकीने मांडतो असल्याचेही खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram