Alandi: ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात, सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट

Continues below advertisement

Alandi: ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात, सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट

पुणे :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला (Saint Dnyaneshwar Maharaj Samadhi Sohla) आजपासून सुरुवात झाली आहे.  मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आज आळंदी (Alandi Bandh)  बंदची हाक दिली आहे. या बंदमुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. आळंदी देवस्थानच्या तीन विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली. यात योगी निरंजननाथ, ऍड. राजेंद्र उमाप आणि डॉ भावार्थ देखणेंचा समावेश आहे. मात्र स्थानिकांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. म्हणूनच आळंदीकर आक्रमक झालेत. सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. 

संजीवन समाधी सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. संत नामदेव, संत पांडुरंग आणि संत कुंडलिक यांची पालखी लाखो वारकऱ्यांसह अलंकापुरीत दाखल होतात. अशावेळी आळंदी बंद ठेवली जाणार असल्यानं, वारकऱ्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवस्थानने आळंदीनगरी बंद ठेऊ नये, असं आवाहन ही केलेलं आहे. मात्र आंदोलक आपल्या भूमीकेवर ठाम असून  वारकऱ्यांना कोणताही ही त्रास होणार नाही, याची खबरदारी आंदोलक घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram