Akshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप
Akshay Shinde's Mother Reaction : अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरनंतर अक्षयच्या पालकांचे गंभीर आरोप
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला असून त्यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. बदलापूर प्रकरणातील खरे आरोपी समोर येऊ नयेत म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिसांना एन्काऊंटरचे आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणातील संस्थाचालक आणि इतर आरोपींना वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. मृत अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. आपला मुलगा रस्ता क्रॉस करतानाही हात पकडायचा, तो पोलिसांची बंदूक हिसकावून घेऊच शकत नाही अशी प्रतिक्रिया अक्षय शिंदेच्या आईने दिली आहे.
टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अक्षय शिंदेची आई म्हणाले की, माझा मुलगा असं करूच शकत नाही. बाहेर रस्ता क्रॉस करतानाही तो माझा हात पकडायचा, रस्ता क्रॉस करतानाही तो गाड्यांना घाबरायचा. असा मुलगा पोलिसांची बंदूक कशी काय हिसकावून घेऊ शकतो?
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आरोपीचा एन्काऊंटर करून गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. या प्रकरणामुळे महाराष्ट्र बदनाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अक्षय शिंदेचा एन्काऊंटर
बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती आहे.