Maharashtra Police Boots | अक्षय कुमारच्या सूचनेनंतर पोलिसांच्या बुटांमध्ये बदल, CM फडणवीसांचा होकार

अभिनेता अक्षय कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अक्षय कुमार यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या बुटांमध्ये बदल करण्याची मागणी केली. सध्याचे बूट पोलिसांना धावण्यास अडथळा निर्माण करतात, तसेच पाठीच्या समस्यांना कारणीभूत ठरतात, असे अक्षय कुमार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची दखल घेतली. त्यांनी अक्षय कुमार यांना बुटांच्या डिझाइनमध्ये सुधारणा सुचवण्यास सांगितले. "तुम्ही सल्ला द्या, असं मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला सांगितलंय." यावर अक्षय कुमार यांनी नवीन डिझाइनचे तपकिरी रंगाचे बूट तयार करून दाखवण्याची तयारी दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे नवीन डिझाइन स्वीकारण्याची ग्वाही दिली. या बदलामुळे पोलिसांना अधिक वेगाने काम करता येईल आणि गुन्हेगारांना पकडणे सोपे होईल, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी 'नायक' चित्रपटाचा उल्लेख करत, एका दिवसात काम पूर्ण करण्याच्या अपेक्षांवरही भाष्य केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola