Akola Flood Rescue : अकोला जिल्ह्यात एका दिवसात विक्रमी 202.9 मिलीमीटर पाऊस, सर्वत्र पूरस्थिती

Continues below advertisement

अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एका दिवसभरात विक्रमी 202.9 मिलीलीटर पाऊस झालाय. या ढगफुटीसदृष्य पावसाने संपुर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होत हाहाकार उडालाय. अकोला शहरातील मोर्णा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलेय. तर शहरातील अनेक वस्त्यांमधील घरातही पाणी शिरलेय. अकोला शहरातील खडकी, कौलखेड, न्यू खेतान नगर, चांदूर, गीतानगर, एमरॉल्ड कॉलनी, अनिकट, जुने शहरातील जाजूनगर अशा अनेक भागात पावसाचं पाणी घुसलंय. जवळपास एक हजार लोकांना घरातून रेस्क्यू करावं लागलंय. आज दुपारपर्यंत हे ऑपरेशन चाललंय. दुपानंतर पाणी ओसरल्यानंतर बाधित लोकांनी पुन्हा नव्याने आपला संसार उभा करायला सुरूवात केलीये. मात्र, पुरामुळे नुकसान झालेल्या परिवारांपर्यंत प्रशासन दुपारनंतरही पोहोचलेलं नव्हतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram