Lockdown 4.0 | या एरियात पुन्हा दिसलात तर हातपाय तोडू, अकोल्यात तरुणांची पोलिसांना धमकी
कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवरील हल्ल्याचे तसंच त्यांना धमकावण्याचे प्रकार काही केल्या कमी होत नाहीत. लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरताना हटकल्याने तरुणांडून चक्क पोलिसांनाच धमकी दिल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात घडला आहे. या परिसरात दिसल्यास परिणाम भोगायला तयार राहा, हातपाय तोडू, अशा शब्दात या टारगटांनी पोलिसांना धमकी दिली.