Akola Protest : अकोल्यात खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती नाही, तरुणाचं साडी नेसून आंदोलन

Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील टाकळी निमखर्दा गावात अक्षय साबळे या तरुणाने गांधीगिरी आंदोलन केले. टाकळी गावामध्ये ईगल इन्फ्रा या कंपनीने पाणीपुरवठा योजनेसाठी रस्ते खोदले होते. हे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र, दोन वर्षांपासून पाइपलाइनचे काम पूर्ण झाले नाही आणि रस्त्यांची दुरुस्तीही झाली नाही. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात गावकऱ्यांना चिखलातून प्रवास करावा लागतो. या समस्येच्या विरोधात अक्षय साबळे यांनी अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात गांधीगिरी आंदोलन केले. अक्षय साबळे थेट साडी नेसून नेहरू पार्क चौकातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी सांगितले की, "मागील अडीच वर्षांपासून एकोणसत्तर खेळवे नंतर पूर्ण रोड खोदलेले आहेत पण अजून पर्यंत आमचे रोड हे दुरुस्त करून देणे कंपनीचे काम होते पण अजून करून देण्यात आलेले नाहीत." कंपनीने रस्ते दुरुस्त करण्याचे काम पूर्ण केले नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे आंदोलन रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करण्यासाठी करण्यात आले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola