Akola : संतापजनक! प्रेयसीनं बुरखा घातल्यानं जमावाची तरुणाला बेदम मारहाण, घटनेचा व्हीडिओ व्हायरल

Continues below advertisement

प्रेयसीनं बुरखा घातला म्हणून जमावानं तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली. अकोला जिल्ह्यातील गायगावच्या इंडियन ऑईल डेपोसमोर शनिवारी भरदिवसा हा प्रकार घडलाय. प्रियकराला मारु नका म्हणून तरुणी जमावाला विनंती करत होती. जमावानं विनंतीला न जुमानता  तरुणाला जबर मारहाण केली. आणि तरुणीला जबरदस्तीनं बुरखा उतरवायला लावला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यानंतर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानंतर उरळ पोलिसांनी कारवाई केली. मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हेही नोंदवण्यात आलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram