Lockdown Akola : अकोल्यात सहा दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात, दवाखाने, मेडिकल, वैद्यकीय सेवांना सूट
Continues below advertisement
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात 22 एप्रिलपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर 15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणामही राज्यात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना आकडेवारीत घट दिसून येत आहे. मात्र तरीही रोज जवळपास 40-50 हजार कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. त्यामुळेच लॉकडाऊन आता 15 मे नंतरही कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 15 मे नंतर आणखी 15 दिवस लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement