Be Positive | शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्र, संकटाच्या काळात शोधली यशाची नवी पायवाट

Continues below advertisement
 : कोरोना आणि 'लॉकडाऊन'मूळे शेतीचे अर्थशास्त्र अन संदर्भ पार बदलून गेलेयेत. याच काळात शेतमाल पार मातीमोल झाल्याने शेतकरी अक्षरश: देशोधडीला लागलाय. मात्र, अकोला जिल्ह्यातील बहादूरा गावातील विठ्ठल माळी या शेतकऱ्यांनं याच संकटाच्या छाताडावर बसत यशाचा एक नवा अध्याय लिहिलाय. शेती अन शेतकऱ्यांना यशाची नवी 'पायवाट' दाखवणारा माळी यांचा हा प्रयोग नेमका आहे तरी कसा?, पाहूयात... 
 
'शेतकरी वाडा'... मुक्काम पोस्ट बहादुरा, तालूका बाळापूर, जिल्हा अकोला.... हा पत्ता आहेय शेतीमूळे नाउमेद होऊ पाहणाऱ्यांत एक नवी उमेद जागवणारा... नवी ऊर्जा पेरणारा... स्विमिंग पुल, हॉर्स रायडींग, बोटींग, बैलगाडीची सैर... अन यासोबतची अगदी ,फुल्ल टू धम्माल', मस्ती... या आनंदाचं नाव आहेय बहादुरा गावातील हे 'शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्र'... अन हे पर्यटन केंद्र जन्माला येण्याची प्रेरणा दडलीये कोरोनामूळे लागलेल्या 'लॉकडाऊन'मध्ये.... अन हे सार घडवून आणणारे 'किमयागार' शेतकरी आहेत विठ्ठल माळी... 
 
विठ्ठल माळी यांची अगदी गावालगत तीस एकर शेती... शेती काहीशी उताराची आणि सखल अशी... सखल भागात पाणी साचत असल्याने त्यांची जवळपास पाच एकर शेती पडीतच होतीय. या पडीत शेतीत पाच वर्षांपूर्वी त्यांनी 30 बाय 30 चे चार आणि 45 बाय 45 चा एक असे पाच शेततळे खोदलेत. त्यात मत्स्यशेती सुरू केलीय. तर दोन वर्षांपूर्वी शेतातच मत्स्यबीज निर्मिती केंद्रही सुरू केलंय. लॉकडाऊन काळात मोकळा वेळ असल्याने त्यांच्या डोक्यात कृषी पर्यटन सुरू करायचा नवा विचार आलाय. अन त्यातूनच मग त्यांना एकामागून एक कल्पना सुचत गेल्यात. बोटींग, स्विमिंग, घोडसवारी, बैलगाडी सवारी असं एक एक करीत त्यांचं कृषी पर्यटन केंद्र आकाराला आलंय. हा 'शेतकरी वाडा' दिवसेंदिवस अधिकाधिक विकसित होतोये. पुढच्या काही दिवसांत येथे निवासासह इतरही अनेक सुविधा निर्माण केल्या जाणारायेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram