Gopikishan Bajoria अकोल्यात संपर्कप्रमुख गोपीकिशन बजोरियांची हक्कालपट्टी, प्रताप जाधवांकडे जबाबदारी
Continues below advertisement
शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरियांकडे सोपवण्यात आलेली संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी औट घटकेची ठरली. त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बुलढाणा लोकसभेसह अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आलीये... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडे अकोला लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविली होती. मात्र त्यांच्या कार्यकाळात अकोला जिल्ह्यात शिंदे गटाला बळकटी मिळण्याऐवजी वादच अधिक झाले होते..
Continues below advertisement