Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार आमदार फारुक शहा यांच्या प्रचारार्थ काल असदुद्दीन ओवेसी यांची धुळे शहरात सभा पार पडली या सभेवेळी ओवेसी यांनी राज्य सरकारवर टीका करत बाबा सिद्दिकी यांच्या झालेल्या हत्याचा देखील यावेळी समाचार घेतला तसेच मराठा आरक्षणासह स्थानिक पातळीवरील विविध विषयांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांचा देखील चांगलाच समाचार घेतला
धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे एमआयएम चे उमेदवार तसेच विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शहा यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील 100 फुटी रोड येथे असुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली या सभेच्या वेळी ओविसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्य सरकारचा चांगला समाचार घेतला असदुद्दीन ओवेसी यांची हत्या कशी झाली याचे उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे, तसेच ज्या पक्षाचे बाबा सिद्दिकी होते त्या पक्षाचे अजित पवार असून जर सिद्दिकी यांची हत्या होत असेल तर अजित पवार कसे सुरक्षित राहतील असा सवाल देखील ओवेसी यांनी यावेळी उपस्थित केला
तुम्ही आमचे मशिदी घेऊन चाललात व बोर्ड घेऊन गेलात अजून काय काय घेऊन जाणार आहात असा प्रश्न उपस्थित करत येत्या 20 तारखेला आम्ही देखील तुमची घेणार आहोत ती म्हणजे धुळ्याची जागा अशा शब्दात देखील ओवेसी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीचा समाचार घेतला तसेच गेल्या पाच वर्षात फारुक शहा यांनी 1300 कोटी रुपयांची निधी आणून विकास कामे केली मात्र अनिल गोटे हे तीन वेळा आमदार राहून त्यांनी 13 कोटी रुपये देखील आणलेले नाहीत असे म्हणत त्यांनी यावेळी अनिल गोटे यांचा देखील चांगला समाचार घेतला यावेळी ओबीसी यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर देखील प्रकाश टाकत मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली...