Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप
Akash Kanaujiya On Mumbai Police : पोलिसांच्या चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, कनौजियाचा आरोप
सैफवर हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाश कनौजिया यानं आपली व्यथा एबीपी माझाकडे व्यक्त केली आहे एक आरोपामुळे आपलं आयुष्य कसं बदललं हे त्याने एबीपी माझाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आकाश कनौजिया असं या तरुणाचं नाव आहे, तो मुंबईत नोकरी करत होता मात्र सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्याला छत्तीसगडमधील दुर्ग स्टेशनवरून संशयीत म्हणून 18 जानेवारीला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान 19 तारखेला मुख्य आरोपी म्हणून शहजादला अटक करण्यात आली होती त्यानंतर याला सोडून देण्यात आलं होतं.. मात्र या सगळ्यामुळे त्याची ड्रायव्हर म्हणून असलेली नोकरी गेली, लग्नाच्या बोलणी सुरू होत्या त्याही मोडल्या, कुटुंबाची मोठी बदनामी झाली...एकूणच त्याचं आय़ुष्यच उध्वस्त झालं असं त्याने एबीपी माझाकडे दुःख व्यक्त केलं आहे. आकाश कनौजिया म्हणाला की मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझं आयुष्य बरबाद झालं. त्यांनी हेदेखील पाहिलं नाही की मला मिशा आहेत आणि सैफवर ज्याने हल्ला केला त्या हल्लेखोराच्या मिशा नाहीत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मी नाही हे त्यांनी नीट पाहिलं नाही. मीडियाने माझे सैफवर हल्ला करणारा संशयित म्हणून फोटो काढले आणि माझ्या कुटुंबाला त्यामुळे धक्का बसला. माझे आई वडील रडू लागले. आकाश कनौजियाने हे देखील सांगितलं की सैफवर हल्ला झाला तेव्हा मला मुंबई पोलिसांचा फोन आला. त्यांनी मला विचारलं की तू कुठे आहेस? मी सांगितलं मी माझ्या घरी आहे. त्यानंतर दुर्गमधून त्यांनी मला ताब्यात घेतलं. त्यावेळी मला रायपूरला नेण्यात आलं. रायपूरहून मुंबईला आणण्यात आलं. मुंबई पोलिसांनी मला मारहाण केली. माझी सुटका झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या घरी गेलो तेव्हा माझ्या आयुष्यात खळबळ माजली होती. कारण मला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. तसंच माझ्या आजीने मला सांगितलं की माझं लग्नही मोडलं आहे. माझ्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबाने घरी येऊन लग्नाची बोलणी थांबवण्यास सांगितलं आहे.