Akasa Air Booking: राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरकडून तिकीट बुकिंग सुरु ABP Majha

विमान प्रवाशांची प्रतीक्षा संपलीय... उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरकडून तिकीट बुकिंग सुरु झालंय. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आलीय. मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि कोच्ची या शहरासाठी तिकीट विक्री सुरु करण्यात आलीय. सात ऑगस्टपासून अकासा एअरचं पहिलं विमान उड्डाण घेणार आहे. सुरुवातीला मुंबई आणि अहमदाबादसाठी ही सेवा सुरु होईल. १३ ऑगस्टनंतर बंगळुरु आणि कोच्चीसाठीही अकासा एअरच्या विमानांचं उड्डाण सुरु होईल. इतर विमान कंपन्यांच्या तिकीटांच्या तुलनेत अकासा एअरची तिकीटं ५ ते ७ टक्के स्वस्त असल्याचा दावा करण्यात येतोय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola