Ajit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी
जयदीप मेढे
Updated at:
24 Jul 2024 07:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Vs Girish Mahajan :कॅबिनेट बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजनांमध्ये खडाजंगी
राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारची बैठक वादळी ठरली.. आजच्या बैठकीत अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.. एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलीय..ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली.. त्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले.. निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का असं अजित पवार म्हणाले..त्यानंतर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला.. सिन्नर तालुक्यातल्या एका स्मारकासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद कशी करण्यात आली असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला