Ajit Pawar Vidhan Sabha Speech:आता कसं वाटतंय? विरोधकांवर निशाणा; सभागृहात अजितदादांची फटकेबाजी
Ajit Pawar Vidhan Sabha Speech:आता कसं वाटतंय? विरोधकांवर निशाणा; सभागृहात अजितदादांची फटकेबाजी
हेही वाचा :
देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षांपूर्वी 'मी पुन्हा येईन' म्हणाले होते. पण ते पुन्हा आलेच नाहीत, दुसरीकडे बसले. मात्र, या पाच वर्षांच्या कालखंडात देवेंद्र फडणवीस यांच्यात काय बदल झाले, हे मगाशी त्यांच्या भाषणातून दिसून आले. देवेंद्र फडणवीस यांच्यात एक आमुलाग्र बदल घडलाय. तो म्हणजे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आताच्या आपल्या भाषणातून विरोधी पक्षासोबत पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या या कृतीचे स्वागत करतो, असे शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातून मला जी गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, विरोधी पक्षाशी संवाद साधण्याची त्यांना असलेली अपेक्षा. त्यांनी गेल्या पाच वर्षांच्या कालखंडात पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले, आज ते पु्न्हा ताकदीने सभागृहात येऊन बसले आहेत. त्यासाठी त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर भाषण करताना जयंत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या खास शैलीत भाषण केले.
विरोधी पक्ष हा किती मोठा किंवा लहान आहे यापेक्षा तो जनतेचा आवाज सभागृहात मांडण्याचे काम करत असतो. दादांनी आपल्या भाषणात काही मुद्दे मांडले. आम्ही तुम्हाला चॅलेंज करतच नाही, तुमची संख्या जास्तच आहे. तुमच्याकडे 237 आमदारांचे संख्याबळ आहे. आता तु्म्ही तिघांनी मन एवढं मोठं केलं पाहिजे की, आपल्या बाजूने 237 नव्हे तर 288 जणांचं सभागृह आहे, असे मानले पाहिजे. आम्ही यापूर्वी सभागृह आणि निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरुन तुम्हाला लक्ष्य केले. पण जनतेने त्यानंतर निकाल दिला आहे. त्यामुळे आता तु्म्ही सरकार चांगल्या पद्धतीने चालवाल, अशी अपेक्षा मी करतो, असे जयंत पाटील यांनी सांगितले.