Ajit Pawar UNCUT PC : मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नाही: अजित पवार

पुणे : राज्यातील शाळा 4 तारखेपासून सुरु करण्याचा निर्णय झाला आहे, मात्र पालकांची आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही. दिवाळीनंतर पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. लहान मुलांच्या लसीबाबत राज्याने निर्णय घेणं उचित नाही. जोपर्यत केंद्राच्या पातळीवर निर्णय होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. केंद्र सरकारने लहान मुलाच्या लसीकरणाबाबत लवकरात लवकर कळवावे असं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 

सध्या पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा दर हा 2.1 टक्के इतका आहे. या आठवड्यात लसीकरणामध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसरा डोस घेतो तो व्यक्ती कोरोनाचे नियम पाळत नसल्याचं दिसून येतंय असं सांगत नागरिकांनी मास्कचा वापर करावा, काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मराठवाडा मध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे. पण त्या ठिकाणी काही तालुके पूर्ण बाधित झाले आहेत तर काही ठिकाणी पूर्ण तालुके बाधित झाले नाहीत. राज्य सरकारने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत, विमा कंपन्याना सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यात खूप नुकसान झालं आहे. त्याची आपण माहीत घेतोय. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंबंधी आम्ही सकारात्मक आहोत."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola