गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूचक फोटो ट्वीट

:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा आज 60वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सूचक फोटो ट्विट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्री बारा वाजताच मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच इलेक्ट्रीक वाहनामध्ये बसलेले दिसत आहेत. पण यातली सूचक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टिअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola