Ajit Pawar Oath for DCM : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ABP Majha
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालाय..वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्याची जी राजकीय स्थिती होती तेच चित्र आज पुन्हा एकदा पहायला मिळतंय. अजित पवारांसह काही आमदारांनी भाजपसोबत सत्तास्थापनेचा मार्ग निवडलाय. यानिमित्ताने जुन्या शपथविधीच्या आठवणी ताज्या झाल्यात...२३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज चार वर्षांनी २ जुलै २०२३ ला पुन्हा हेच चित्र पहायला मिळतंय..त्यावेळी पहाटेचा शपथविधी झाला होता आज मात्र दुपारच्या मुहूर्तावर अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये...अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान देत घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय.