Ajit Pawar : महत्वाच्या पदावर बसलेल्यांनी बोलताना भान ठेवावं, तानाजी सावंतांवर हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
Tanaji Sawant : आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. त्यांना राज्याचा आरोग्य मंत्री म्हणून मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणार असे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांनी केलं आहे. माझ्या विभागाकडे राज्यातील चार मेंटल हॉस्पिटल आहेत. चार मेंटल हॉस्पिटलपैकी एका हॉस्पिटलमध्ये आदित्य ठाकरेंसाठी बेड आरक्षित ठेवणार असल्याचे सावंत म्हणाले. तानाजी सावंत यांच्या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसैनिक वर्गणी काढून सावंत यांच्यासाठी कृपामाई मेंटल हॉस्पिटलमध्ये बेड राखून ठेवणार असल्याचे हाके म्हणाले.
Continues below advertisement