Ajit Pawar Speech Baramati : संसदेत भाषणं करुन कामं होत नाही, अजित पवारांची फटकेबाजी

Continues below advertisement

Ajit Pawar Speech Baramati : संसदेत भाषणं करुन कामं होत नाही, अजित पवारांची फटकेबाजी

बारामती: आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल. त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिकपणे विचार करु नका. भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. कामं ही तडफेनेच करावी लागतात, जोरकसपणे करावी लागतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मतांनी निवडून दिले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे, अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. 

अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरुन शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला. आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही. कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे.   मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. इतरांसाठी एवढं करून मला एकटे पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने काम करु शकतो, असे भावनिक आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram