Ajit Pawar Hinjewadi Visit: हिंजवडीत अजित दादांचा ॲक्शन मोड, सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल होणार

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच Hinjewadi परिसरातील समस्यांची पाहणी केली. दोन आठवड्यांपूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार विकास कामांना सुरुवात झाली की नाही, याची अजित पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. Hinjewadi परिसरातील वाहतूक कोंडी, रस्ते आणि इतर नागरी समस्यांबाबत अजित पवार आक्रमक झाल्याचे यावेळी बघायला मिळाले. रस्त्यांवर अधिकाऱ्यांची पाहणी केली. विकास कामाच्या आड कोणी आले तरी "सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करा" अशी स्पष्ट सूचना अजित पवार यांनी दिली. कोणी आडवा आला तर समजावून सांगा, एकदाच काम करून टाकायचं असे अजित पवार म्हणाले. प्रत्येकजण काहीतरी कारणे देत काम थांबवत असेल, तर ते होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. एकदाच संपूर्ण काम करून टाकायचे यावर अजित पवार यांनी भर दिला. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्यांवर कलम 353 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola