Ajit Pawar Speech Manchar : Amol Kolhe यांच्यावर सडकून टीका, अजित पवारांनी सांगितली हिस्ट्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागले, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल 40 आमदारांना आपल्यासोबत आणणाऱ्या अजित पवार यांच्या तोंडाला भाजपने करताना पाने पुसल्याची खोचक चर्चा विरोधकांनी सुरु केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या टीकाकारांना रोखठोक प्रत्युत्तर दिले. लोकसभेच्या जागावाटपात आम्हाला केवळ तीन जागा मिळाल्या, असा गैरसमज काहीजणांकडून पसरवला जात आहे. आम्ही जास्त जागांची मागणी केली होती. परंतु, यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) 23 आणि शिंदे गटाचे 18 खासदार निवडून आले आहेत. या सर्व जागांवर आम्हाला पुन्हा उमेदवारी मिळावी, असा त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मर्यादित जागा आल्या, असा बचाव अजित पवार यांच्याकडून करण्यात आला. ते मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.