Baramati : सरकार पण तुमचंच, सरकारला लुटू नका अजित पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
बारामतीतील माळेगाव येथे राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात आज अजित पावर बोलत होते. या दरम्यान रस्ता रुंदीकरणाबाबत भाष्य केलं. रस्ता रुंदीकरण मध्ये लोकांनी रस्त्याच्या कडेला झाडं लावलीत.. जो जमिनीचा भाग रस्त्यात जातोय त्याच ठिकाणी लोकांनी झाडं लावली.. दुसऱ्या बाजूला नाही लावली मी प्रांतधिकारी यांना विचारलं तर ते म्हणाले दादा आंबा, नारळ याची झाडं लावली की जास्त पैसे मिळतात.. त्यामुळे लोकं अशी झाडं लावतात.. सरकार पण तुमचंच आहे सरकारला लुटू नका शेतकऱ्यांना अजित पवारांचा सल्ला..