Ajit Pawar Shikhar Bank : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली
Ajit Pawar Shikhar Bank : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांची चिंता वाढली
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजितदादांची चिंता वाढली ईओडब्ल्यूनं दिलेल्या 'क्लीन चिट'ला आव्हान देत याचिका, 5 ऑक्टोबरला सुनावणी 25 हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढण्याची चिन्ह तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय मात्र त्याला विरोध करीत चार नवीन याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ असराजी साबळे, रामदास पाटीबा शिंगणे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत चार स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या आहेत शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे ईओडब्ल्यूने सप्टेंबर 2020 मध्ये अजित पवार यांना 'क्लीन चिट' देत पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता त्यानंतर यंदा मार्चमध्ये अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला या दोन्ही रिपोर्टवर आक्षेप घेत यापूर्वी सात सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केल्या आहेत त्यापाठोपाठ सहकारी साखर कारखान्यांतील सभासदांनीही न्यायालयात धाव घेतली आहे