Ajit Pawar News : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शरद पवार पक्षाच जाणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar News : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का; शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, शरद पवार पक्षाच जाणार
पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. ४ पदाधिकाऱ्यांसह एकूण २४ जणांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत या २४ जणांनी तुतारी हाती घेतली आहे. काल(मंगळवारी) या सर्व नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे खासदार सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले होते. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना (Ajit Pawar) मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे.
अजित गव्हाणे यांचा समर्थकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आज प्रवेश झाला आहे. पुण्यातील मोदी बागेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत या सर्वांनी प्रवेश केला आहे. ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे आदीसह १५ ते १६ नगरसेवक यावेळी उपस्थित होते. माजी आमदार विलास लांडे देखील उपस्थित होते.