Ajit Pawar : जयंतरावांना फोन का नाही केला? दादा म्हणाले..फोन करण्यापेक्षा त्यांना भेटेन

Continues below advertisement

Jayan Patil ED Enquiry : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं सोमवारी तब्बल 9 तास चौकशी केली. IL&FS घोटाळ्याप्रकरणी ईडीनं जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला. महत्त्वाचं म्हणजे, ईडीनं काही कागदपत्रं देखील मागवली होती, मात्र जयंत पाटलांनी ती सोबत नेली नव्हती. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, जयंत पाटलांची चौकशी झाल्यानंतर त्यांना महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी फोन केले. ईडी चौकशी झाल्यानंतर त्यांची विचारपूस केली. मात्र, राष्ट्रवादीच्या वरच्या फळीत समाविष्ठ होणारे अजित पवारांचा मात्र फोन करणाऱ्या नेत्यांमध्ये समावेश नव्हता. याबाबत खुद्द जयंत पाटलांनी माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram