Baramati Ajit Pawar : अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका आज 7 ठिकाणी सभा,अजित पवार बारामती दौऱ्यावर

Continues below advertisement

Baramati Ajit Pawar : अजित पवारांच्या प्रचार सभांचा धडाका आज 7 ठिकाणी सभा,अजित पवार बारामती दौऱ्यावर
विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग आलाय... उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या इंदापूर दौऱ्यावर आहेत.  उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील विविध कामांचा शुभारंभ करतील. तर बारामती शहरासह तालुक्यातील सात ठिकाणी उपमुख्यमंत्री बैठका घेतील. याच सभेमध्ये सुनेत्रा पवार यांची उमेदवारी घोषित होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. बारामती तालुक्यातील सुपे, कोऱ्हाळे, निरावागज, झारगडवाडी, करंजे पूल, माळेगाव अशा 6 ठिकाणी अजित पवारांच्या  सभा होणार आहेत तर बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात संध्याकाळी सातवी सभा होणार आहे...दरम्यान विजय शिवतारेंनी केलेल्या टीकेला आज अजित पवार काय उत्तर देतात हे
पाहावं लागेल... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram