Maharashtra Politics: 'मिमिक्री करणारे करत राहतील, मी काम करत राहीन', राज ठाकरेंच्या नक्कलवर अजित पवारांचे प्रत्युत्तर.
Continues below advertisement
राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तर दुसरीकडे आगामी पालिका निवडणुकांसाठी मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार का, यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज ठाकरेंच्या नक्कलवर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, 'मला कोणी उद्या माझी मिमिक्री केली तर माझ्या अंगावर भोकं पडत नाही, हे जे मिमिक्री करणारे मिमिक्री करत राहतील, काम करणारं कामाचा म्हणून मी काम करत राहीन'. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांसोबतच्या बैठकीला महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही उपस्थित राहिल्याने आघाडीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, पत्रकार परिषदेत यावर थेट उत्तर देणे टाळत, आता निवडणुका कशा होणार हे महत्त्वाचे आहे, कोणासोबत होणार हा विषय नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement