NCP Meeting: अजित पवारांनी Manikrao Kokate, Narhari Zirwal यांची कानउघडणी केली, मंत्र्यांना खडे बोल
Continues below advertisement
राज्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) बैठकांचे सत्र सुरू केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या बैठकांमध्ये आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले. 'आगामी निवडणुकांसाठी जिल्ह्यांमध्येही लक्ष द्या,' अशा स्पष्ट सूचना अजित पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत. या बैठकांमध्ये अजित पवारांनी सर्व खात्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांची कानउघडणी केल्याची माहिती आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर आणि निवडणुकीत मोठे यश मिळवण्यावर या बैठकांचा मुख्य भर होता.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement