Ajit Pawar : सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उतरवणं मोठी चूक - अजित पवार

Continues below advertisement

Ajit Pawar : सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उतरवणं मोठी चूक - अजित पवार 

राज्यात लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीची लगबग सुरु असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी एक स्फोटक कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना रिंगणात उतरवणे, ही एक मोठी चूक असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हे पार घरामध्ये शिरुन द्यायचं नसतं. मागे मात्र माझ्याकडून थोडी चूक झाली. त्या काळामध्ये मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. त्यावेळेस केलं गेलं, पार्लामेंटरी बोर्डाकडून निर्णय घेतला गेला. पण एकदा बाण सुटल्यावर आपण करु शकत नाही. पण आज माझं मन मला सांगतं, तसं व्हायला नको होतं, अशी कबुली अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ते एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी दिलेली कबुली महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाची नांदी तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीत पवार घराण्यातील दोन व्यक्तींना आमनेसामने लढवण्याची चूक लक्षात आल्यानंतर तुम्ही आता रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवार यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहि‍णींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram