Ajit Pawar On Phd : पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून अजित पवारांची दिलगिरी
Ajit Pawar On Phd : पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून अजित पवारांची दिलगिरी पीएचडीबाबतच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केलीय.'पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.' असं अजित पवार म्हणालेत. तर विधानपरिषदेत चर्चेदरम्यान 'पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?', असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. तर त्यांच्या या विधानानंतर टीकेची झोड उठली होती.