Maharashtra Politics: 'मुख्यमंत्री मोहन भागवतांशी चर्चा करणार', MOA अध्यक्ष होताच अजित पवारांची जीभ घसरली?
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे, तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अजित पवार म्हणाले की, 'उद्याच्याला थोडसं काही निवडीच्या बद्दल आम्हाला मुख्यमंत्री मोहन भागवत यांशी पण चर्चा करायची आहे'. या अनपेक्षित वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीपूर्वी सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. असोसिएशनच्या २९ सदस्यीय कार्यकारिणीची निवड केली जाणार असून, यात खेळाडूंना आणि विविध संघटनांना प्राधान्य दिले जाईल असे अजित पवारांनी स्पष्ट केले. तसेच, असोसिएशनच्या आर्थिक कारभारात पूर्ण पारदर्शकता ठेवली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement