Ajit Pawar : कोकणातल्या चाकरमान्यांसाठी अजितदादा सरसावले, अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी
Continues below advertisement
गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनीटात फुल्ल होत आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात..या सगळ्यामध्ये चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्राव्दारे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना केली आहे. तसंच यामध्ये दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सध्या सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैर प्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचंही अजित पवारांनी या पत्रात म्हटलंय.
Continues below advertisement