Ajit Pawar on Uddhav Thackeray : शिवसेनेतील फुटीची कल्पना उद्धव ठाकरे यांना शरद पवारांनी दिली होती
Continues below advertisement
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतील फुटीबाबत मोठे गौप्यस्फोट केलेत. मोठी बंडखोरी होण्याआधीच यांची कल्पना उद्धव ठाकरे यांना आधीच होती. खुद्द शरद पवार आणि आपण याबाबत उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती असं खळबळजनक वक्तव्य अजित पवार यांनी केलंय. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असून एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करतो असं सांगितलं होतं, असंही अजित पवार म्हणालेत. त्याचसोबत सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्याबाबत शरद पवार यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितलं होतं मात्र, त्यांनी सुधीर तांबे यांनाच उमेदवारी दिली. अशी माहितीही अजित पवार यांनी दिलीय.
Continues below advertisement