ST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटी, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये : Ajit Pawar
Continues below advertisement
धुळे जिल्ह्यातील साक्री डेपोमधील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीय. कमलेश बेडसे असं या एसटी कर्मचाऱ्याचे नाव असून साक्री डेपोत एसटी चालक म्हणून काम करत होता. आत्महत्येला एसटी महामंडळ जबाबदार असल्याचा उल्लेख कमलेशच्या सुसाईड नोटमध्ये आहे. एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमित वेतनामुळे जीवन संपवत असल्याचं कमलेशनं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय. कमलेशच्या आत्महत्येनंतर एसटी महामंडळातील विविध संघटना आक्रमक झाल्यात. या घटनेनंतर आज अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत ST कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 500 कोटींचा निधी घोषीत केला असुन एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भुमिका घेऊ नये अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Continues below advertisement