Pune Land Deal: 'मी कामाचा माणूस, चुकीचं खपत नाही', Deputy CM Ajit Pawar यांचे स्पष्टीकरण

Continues below advertisement
आष्टी (Ashti) येथे भाजपचे (BJP) माजी आमदार भीमराव धोंडे (Bhimrao Dhonde) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला, हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जातो. याच कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांनी पुण्यातील (Pune) वादग्रस्त जमीन प्रकरणावर भाष्य केले. 'मी कामाचा माणूस असून मला चुकीचं खपत नाही,' असे वक्तव्य अजित पवारांनी केले. चौकशीनंतर 'दूध का दूध, पाणी का पाणी' होईल आणि सत्य समोर येईल, असेही ते म्हणाले. आपण नियमांचे पालन करणारे असून, आपल्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करत असल्यास अधिकाऱ्यांनी नियमानुसार कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola