सहा तारखेपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, खासदार संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
पुणे : 6 जून, राज्याभिषेक सोहळा दिनापर्यंत मराठा आरक्षणाबाबत काही भूमिका घेतली नाही तर रायगडावरुन आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत. कोरोना वगेरे आम्ही बघणार नाही. त्यावेळी सर्वात पुढे मी असेन, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सहा तारखेला अजून वेळ आहे. तोपर्यंत काहीतरी मार्ग निघेल. चर्चा होईल. काहींना यातून फक्त राजकारण करायचंय, असं पवार म्हणाले.
Tags :
Maratha Reservation Ajit Pawar Raj Thackeray Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Maratha Aarakshan Sambhajiraje Bhosale