Ajit Pawar on Election Results : तीन राज्यातल्या जनतेची भाजपला साथ, अजित पवारांकडून अभिनंदन

Ajit Pawar on Election Results : तीन राज्यातल्या जनतेची भाजपला साथ, अजित पवारांकडून अभिनंदन

रायगड तीन राज्यात भाजपने (BJP)  सत्ता खेचली आहे. तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी (PM Modi)  हेच त्रिवार सत्य आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले, 

अजित पवार म्हणाले,  मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे.  निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं ठरलं नाही. जनतेने जो कौल दिला आहे तो मान्य केला पाहिजे. ईव्हीएम घोटाळा एकाला शक्य नाही.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola